Rain Update: रात्रीपासून मुंबई आणि कोकणातील बऱ्याच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळतआहे. त्यातच आता मराठवाड्यात सुद्धा पुढील आठवडाभर जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर सोबतचवादळी वाऱ्याची शक्यता सुद्धा हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, 5 जुलै रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्हा,जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळ वारा व विजेच्या कडकडाटासहमध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 6 आणि 7 जुलैदरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यतावर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यात बऱ्यापैकी पेरण्या झाल्या आहेत. तर अजूनही काही पेरण्या बाकी आहेत. 75 ते 100 मिमी पावसाची नोंदझाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नयेत असा सल्ला कृषी विभागाने दिला होता. त्यामुळे चांगल्या पावसाची वाट पाहता बऱ्याचपेरण्या अजून शिल्लक आहे.
मात्र उशिरा पेरणी केल्यास उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्याउरकल्या होत्या. मात्र चांगला पाऊस झाला तरच ही पिकं जगू शकणार आहे. त्यामुळे आजपासून पडणारा पाऊस या पिकांसाठीजीवनदान ठरणार आहे.