Type Here to Get Search Results !

ad

अक्षय तृतीया म्हणजे काय

अक्षय तृतीया म्हणजे काय 


अक्षय्य शब्दाचा अर्थ आहे ‘कधीही नाश होत नाही असा’. या दिवशी केलेला जपदानज्ञान हे अक्षय्य फळप्राप्ती देणारे असतेम्हणूनयाला अक्षय तृतीया  असे म्हणतातभविष्यपुराणमत्स्य पुराण , पद्मपुराणविष्णुधर्मोत्तर पुराणस्कंदपुराणात याचा विषेश उल्लेखकेलेला आढळतो

अक्षय तृतीया म्हणजे काय


या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे श्रेष्ठ फळ मिळतेया दिवशी देवांचे  पितरांचे पूजन केले जातेवैशाख महिना हाभगवान विष्णु साठी आवडता आहेम्हणून विशेषतः विष्णू  देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते.

जी माणसे सूर्योदयाच्या वेळी उठून अंघोळ करून भगवान विष्णूची पूजा करतात  कथा ऐकतात त्यांना मोक्षाची प्राप्ती होतेया दिवशीभगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी दान करतात त्यांच्या या पुण्यकार्याला देव अक्षय फळ देतो.

वैशाख शुक्ल पक्षातील तृतुयेच्या दिवशी गंगेत आंघोळ करणारा माणूस सगळ्या पापांतून मुक्त होतो असे भविष्यपुराणातीलमध्यमपर्वात सांगितले गेले आहेजे काही दान केले जाते ते अक्षय होतेविशेषतः मोदक दिल्याने  गुळ आणि कापुराच्या सहाय्यानेजलदान केल्याने विशेष पुण्या प्राप्त होतेअशा माणसांची ब्रम्हलोकात गणना होते.

वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी  मोदकाच्या दानाने ब्रम्ह तसेच सगळे देवता प्रसन्न होतातया दिवशी अन्नवस्त्रसोने आणि पाण्याचे दन केल्याने अक्षय फळाची प्राप्ती होतेया दिवशी जे काही दान केले करतो ते अक्षय होते आणि दान देणाऱ्यालासूर्यलोकाची प्राप्ती होतेया दिवशी जो उपास करतो तो सुख-समृद्धीने संपन्न होतो.