SBI बँक ग्राहकांसाठी कामाची बातमी आहे. एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे. ATM व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी SBI ने एक नवीन निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला SBI ATM मधून पैसे काढण्यासाठी OTP टाकावा लागेल. ( SBI New Rule)
या नवीन नियमात ग्राहकांना OTP शिवाय पैसे काढता येणार नाहीत. रोख रक्कम काढण्याच्या वेळी, ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनवर एक ओटीपी मिळेल, एटीएममधून पैसे काढता येतील.
बँकेने ट्विट करून दिली ही माहिती
बँकेने ट्विट करून ही माहिती दिली आहे. ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, 'एसबीआय एटीएममधील व्यवहारांसाठी आमची ओटीपी आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली फसवणूकीला आळा घालण्यासाठी आहे. फसवणुकीपासून तुमचे संरक्षण करणे हे नेहमीच आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल.
हे नियम 10,000 रुपये आणि त्याहून अधिक पैसे काढण्यावर लागू होतील. SBI ग्राहकांना त्यांच्या एटीएममधून प्रत्येक वेळी त्यांच्या बँक खात्यातून त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आणि डेबिट कार्डच्या पिनवर पाठवलेल्या ओटीपीसह 10,000 रुपये आणि त्याहून अधिक रक्कम काढण्याची परवानगी देईल.