kkkk
दरवर्षी १६ डिसेंबर हा दिवस भारतात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस 1971 मध्ये भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 1971 मध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगलादेश बनला. 16 डिसेंबरच्या दिवशी पराभव स्वीकारून पाकिस्तानी सैन्याने आपली शस्त्रे भारतीय सैन्यासमोर ठेवली. या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा केला जातो आणि देशाच्या शूर सैनिकांचे स्मरण केले जाते. या खास दिवसासाठी, आम्ही घेऊन आलो आहोत विजय दिवसाच्या शुभेच्छा संदेश, संदेश, शायरी, स्टेटस, कोट्स, प्रतिमा.
1971 रोजी पाकिस्तानवर भारतीय सेनेने ऐतिसाहिक विजय मिळवल्याने प्रत्येक वर्षी 16 डिसेंबरला 'विजय दिवस' साजरा केला जातो. तर 1971 च्या युद्धात बांग्लादेशाच्या मुक्तीसाठी भारतीय सेनेकडून पाकिस्तानवर विजय मिळवल्याच्या कारणास्तव हा दिवस साजरा केला जातो. तर बांग्लादेशाला याआधी पाकिस्तान म्हणून संबोधले जात होते. याच दिवशी बांग्लादेशात बिजॉय दिबोस साजरा केला जातो. पाकिस्तानच्या विरोधातील युद्धादरम्यान आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शहींदांना या दिवशी श्रद्धांजली वाहिली जाते. 1971 च्या युद्धात भारताने पाकिस्तानला दोन भागात विभागले. त्यामुळे भारताचा हा सर्वात मोठा विजय मानला जातो.
3 डिसेंबर 1971 मध्ये भारत सरकारने पाकिस्तानच्या विरोधात युद्धाचे रणशिंग फुंकले आणि पाकिस्तानच्या सैन्याचे प्रमुख जनरल अयुब खान यांच्या अत्याचारापासून पूर्व पाकिस्तानला मुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या दोघांमधील हे युद्ध जवळजवळ 13 दिवस सुरु झाल्यानंतर समाप्त झाले. त्यानंतर 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी सेनेने कोणत्याही शर्थीसह आत्मसमर्पण केले