Type Here to Get Search Results !

ad

जबरदस्त मराठी कॉमेडी जोक भाग 1

मराठी जोक


 फेसबुक म्हणजे काय....????

.
.
एक असे ठिकाण ,
जिथे मुलगा जोक पोस्ट
करतो पण त्याला काहीच प्रतिसाद मिळत
नाही.....
आणि
तोच जोक मुलगी पोस्ट
करते तेंव्हा १०० लाईक, २० फ्रेंड रिक्वेस्ट
येतात... बरोबर ना!!!

kkkkkkk

एका अंधारी रात्री
सुनसान सड़क
एक मुलगा आणि मुलगी
दोघेही बाइक नि जात होते
मुलाने बाइक थाम्बवाली..
मुलीला उतरवले
तिचा हात पकडला...
मुलगी लाजली....
मुलगा बोलला:-
.
.
.
चल धक्का मार,
पेट्रोल संपलाय..

गण्या : काय रे तुझे आणि वहिणी चे भांडण मिटले का???

मन्या : हो..गुडघ्यावर रांगत रांगत आली होती माझ्याकडे..

गण्या : हो का.?
मग काय म्हणाल्या रे वहिणी...!

मन्या : कॉट च्या खाली लपु नका, या बाहेर....
मारणार नाही मी

ती मला म्हणाली

जिना सिर्फ मेरे लिये .
.
.
जिना सिर्फ मेरे लिये.
.
.
.मी म्हणालो - बर, मी लिफ्ट ने जातो

रिक्षावाला - बोला साहेब , कुठे जाणार ?
गंपू - नवी मुंबईला.
रिक्षावाला- पण साहेब , कोणत्या क्लासने जायचं ते  सांगा.
गंपू - आं...रेल्वेतला , विमानातला क्लास माहितीय. पण  रिक्षातक्लास म्हणजे काय ?
रिक्षावाला - फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे  चुकवून रिक्षा चालवणार. सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून  रिक्षा चालवणार.
... गंपू - आणि थर्ड क्लास ?
रिक्षावाला - थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार  आणि तुम्ही रिक्षा चालवायची...!



बाबा:-काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?
चंदु:-हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या...
बाबा:-ऑ...मॅडम कशा नापास होतील गाढवा?
चंदु:-हो बाबा , त्या अजुन त्याच वर्गाला शिकवतात..



नातु : हॅलो आजी. इंद्रजित बोलतो.

आजी : कोण बोलतोय? नीट ऐकु येईना.

नातु : इंद्रजित बोलतोय म्हटलं.

आजी : इंग्रजीत नको रे बाबा मराठीतच बोल

बंटीच्या घरी आलेले पाहुणे जेवायला बसलेले असताना बंटीमोठ्याने म्हणाला

“आई, आपल्याकडे आजोबा, आजी आणि आत्या आले आहेत. .
.
तू तर म्हणत होतीस की म्हसोबा, सटवी आणि टवळी चरायला येणार  आहेत,
.
त्यांच काय झाल ?

आई : बाळ तू खूप मोठा हो...

बाळ : आई मी इतका मोठा होईल की पोस्टाच्या तिकीटावर माझा फोटो राहील.

आई : बाळ इतका मोठा नको होऊ कारण लोक मागून थुका लावतात आणि पुढून बुक्क्या मारतात.

काही लोकं आपल्याच नाकात
आपलेच बोटं घालून गरागरा फिरवितात,
नाकातून बोट काढतात
आणि
बोटाकडे अश्या नजरेने पाहतात
जणू काही नाकातून एखादा मोतीच
बाहेर आलाय...!

दुकानदार .काय पाहिजे

गिऱ्हाईक . मला ताकद पाहिजे हिंमत पाहिजे
अक्कल पण पाहिजे

दुकानदार .सहेबांना एक दारू चा खंबा दे
आणि मुगदाळ दे पाच वाली

सरदार - डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही,
झोपून उठल्यावर झोप येत नाही ,
काय करू?

डॉक्टर- रात्री उठून उनात बसत जा, सगळे ठीक होईल :)


संताला आपला कुत्रा विकायचा होता. आणि बंता त्याला विकत घेणार होता.

बंता - हा कुत्रा विश्वासू तर आहे ना ?

संता - हो आहेना, मी याला आतापर्यंत तिनदा विकलेले आहे, पण तो एवढा विश्वासू आहे की प्रत्येक वेळी पुन्हा माझ्याजवळच परत येतो.

एका सरदाराने 1 एप्रिलला सीटी बसमधे कंडक्टरकडून 5 रुपयाचे टिकीट विकत घेतले आणि तो कंडक्टरला म्हणाला, '' एप्रिल फुल''

'' कसे काय?'' कंडक्टरने विचारले.

'' कारण माझ्याजवळ ऑलरेडी बसचा पास आहे''


नोकर- ‘साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, हे घ्या.’

मालक- ‘मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या’

नोकर - ‘म्हणूनच परत करीत आहे.’

मित्रानो तुम्हाला जर दुसरा भाग बघायचा असेल तर कमेंट मध्ये सांगा