राष्ट्रवादी च्या या नेत्याने केली आत्महत्या ! धक्कादायक
Type Here to Get Search Results !

ad

राष्ट्रवादी च्या या नेत्याने केली आत्महत्या ! धक्कादायक

लोहारा, 27 सप्टेंबर: उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील लोहारा (Lohara) याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) एका पदाधिकाऱ्याने कार्यालयातच आपल्या आयुष्याचा शेवट (office bearer commits suicide) केला आहे. कार्यालयात कुणीही नसताना संबंधित पदाधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. यावेळी पोलिसांना कार्यलयातील टेबलवर सुसाइड नोट (Suicide note found) मिळाली असून यामध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्वरित गावातील दोन महिलांसह एका पुरुषाला अटक (3 arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हणमंत दनाणे असं आत्महत्या करणाऱ्या पदाधिकाऱ्याचं नाव असून संबंधित घटना लोहारा तालुक्यातील वडगाव येथील कार्यालयात घडली आहे. मृत दणाने हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस होते. शनिवारी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान त्यांनी आपल्या कार्यालयात गळफास घेत आत्महत्या केली आहे. साडे दहाच्या सुमारास शशिकांत डोलारे नावाचा युवक कार्यालयात पोहोचला असता, ही घटना उघडकीस आली आहे.

संबंधित प्रकार लक्षात येताच शशिकांत यांनी त्वरित या घटनेची माहिती मृत दनाणे यांच्या वडिलांना दिली आहे. दनाणे यांच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली असता, मुलाने केलेला प्रकार पाहून त्यांच्या पायाखालची जमिनच हादरली. यानंतर मृत दनाणे यांच्या वडिलांनी संबंधित घटनेची माहिती लोहारा पोलीस ठाण्याला कळवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

close